लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
.पुणे :- नगर - शिरूर -पुणे या महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढली असून अनेक वेळा शिक्रापूर पासूनच ट्रॉफिक जाम होत आहे . त्यामुळे उद्योजक , व्यावसायिक यांचेसह चाकार मान्यांना तास न तास ताटकळत रहावे लागते . त्यावर आता कायम स्वरूपी उपाय शोधला असून केद्रिय मंत्री ना. नितिन गडकरी यांनी पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट अॅक्सेस रोडची घोषणा केली आहे . त्यामुळे नगर - शिरूर ते पुणे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे .
शिरुर-नगर महामार्गाबाबतही अनेक तक्रारी समोर येत असून, दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत जाणार आहे. पुणे-नगर महामार्गावर डबल लेन पूल करायला सांगितले होते. १६ लेनच्या रस्त्याचे डिझाईन सुद्धा करायला सांगितले होते. आता आगामी ६ महिन्यांत या कामांना काम सुरुवात होणार आहे. त्याचवेळी पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट अॅक्सेस रोड होणार आहे, अशी मोठी घोषणा केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी केली.
नितीन गडकरी हे आज (शनिवारी) पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, 'पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट अॅक्सेस रोड झाल्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच पुणे-मुंबई वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे त्याच सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, गुजरात या राज्यातून थेट दक्षिणेतील हैदराबाद, बेंगलोर, त्रिवेंद्रम आणि चेन्नई अशा चार दिशांना जाणारी वाहतूक खूप मोठी आहे. त्यामुळे आम्ही मुंबई ते दिल्ली असा हा बारा लेनचा महामार्गाचे काम सुरु केले आहे. त्यामुळे मुंबई-दिल्लीपर्यंत अंतर १२-१३ तासांत कापता येईल. तसेच सुरतपासून नवा महामार्ग केल्याने पुणे, मुंबई, नगर, नाशिक महामार्गावरची वाहतूक कमी आणि प्रदुषण कमी होण्यास मदत होईल.'
0 टिप्पण्या