लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
चेन्नई :- रोहित शर्मावर या
सामन्यापूर्वी बऱ्याच जणांनी टीका केली. पण रोहितने आज सुरु झालेल्या दुसऱ्या
सामन्यात शानदार शतक झळकावले. रोहितचे हे कसोटी क्रिकेटमधील सातवे शतक असून, भारताकडून यावर्षी
पहिले शतक झळकावण्याचा मान रोहितने पटकावला आहे.
रोहितने
यावेळी १३० चेंडूंमध्ये आपेल शतक साजरे केले. रोहितने यावेळी इंग्लंडचा फिरकीपटू
मोईन अलीच्या चेंडूवर दुहेरी धाव घेत आपले शतक साजरे केले. रोहितचे
कसोटी क्रिकेटमधील हे सातवे शतक ठरले आहे. या सामन्यापूर्वी काही जणांनी रोहितवर
टीका केली होती. रोहित हा ट्वेन्टी आणि वनडेचा खेळाडू आहे, त्याला कसोटी क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी करता येत नाही, असे काही जणांनी म्हटले होते. पण रोहितने हे शतक झळकावत चाहत्यांची
तोडं बंद केली आहेत.
टीम इंडियाचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना
रोहित शर्मा मात्र धडाकेबाज फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले होते. रोहितने
यावेळी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रोहितने जलदगतीने धावा
केल्यामुळेच भारताला लंचपूर्वी शतक पूर्ण करता आले होते. त्यामुळे आता रोहित
चांगल्या फॉर्मात आला असून तो किती धावा करतो,
याकडे सर्वांचे लक्ष असेल.
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली
आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताला यावेळी चांगली सुरुवात
मिळाली नाही. कारण भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल हा शून्यावर आऊट झाला.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजाराला जास्त धावा करता आल्या नाहीत.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कोहलीला फक्त पाच चेंडूच खेळता आले आणि एकही धाव न
करता तो बाद झाला.
0 टिप्पण्या