लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमनगर : कोविड - मुळे मागील
वर्षभरात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये झालेली नाही .
त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांना लोकांनी ज्या पाच वर्षासाठी निवडून दिले त्यापैकी
एक वर्ष वाया गेले आहे . याकालखंडात कुठलेच ठोस स्वरूपाचे काम जिल्हा परिषद
सदस्यांना करता आलेले नाही . दि .२६ / ०२ / २०२१ रोजी आपण सुरवातीस या मिटिंगचे
आयोजन प्रत्यक्षात केले होते . त्यानंतर आपण जिल्हा परिषदेची हि साधारण सभा Google Meet द्वारे घेणार असल्याचे कळवले आहे . गेल्या एक वर्षांच्या कालखंडानंतर
प्रत्यक्ष उपस्थितीत होणारी मिटिंग Google Meet द्वारे
घेतल्यास जिल्हा परिषद सदस्यांना आपापल्या गटातील कामे सक्षमपणे मांडण्याची संधी
मिळणार नाही .त्यामुले ही सभा सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये घेण्यात यावी अशी
मागणी जि. प. सद्स्या हर्षदाताई काकडे यानी
केली आहे.
सौ. काकडे
यानी सर्व पदाधिकार्याना निवेदन दिले आहे की, वास्तविक पाहता लोकसभा , राज्यसभा
, विधानसभा , विधानपरिषद सदस्यांची
अधिवेशने व मिटिंग कोविड कालखंडातही नियमितपणे प्रत्यक्ष उपस्थितीत झालेल्या आहेत
. गेल्या वर्षभरात Google Meet द्वारे झालेल्या सभेतून
ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषद सदस्यांना ठोस पणे काही करता आलेले नाही
. व त्यातून काही ठोस स्वरूपाचे काही निष्पन्न झाले नाही . Google Meet च्या सभेला फार मोठ्या प्रमाणात मर्यादा आहेत . या सगळ्या पार्श्वभूमीवर
आपण एखाद्या मंगल कार्यालयात अथवा मोकळ्या जागेत सामाजिक अंतर ठेऊन व आरोग्याचे
सर्व नियम पाळून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सदस्यांच्या प्रत्यक्ष
उपस्थितीमध्ये घेतल्यास ग्रामीण भागातील विकासाच्या कामांना न्याय देता येईल ,
अशी बहुतांश जिल्हा परिषद सदस्यांची भावना आहे.
वर्षभरात प्रत्यक्ष सभा
न झाल्यामुळे सदस्यांना आपापल्या गटातील प्रश्न समक्षपणे मांडता । आले नाही .
त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारावर गदा आलेली आहे . हा अडथला दूर
करण्यास आपण सक्षम आहात . तरी सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण व आपल्या
सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात सभा घेण्याचे नियोजन करावे . ग्रामीण आरोग्य
यंत्रणेवर जिल्हा परिषदेचे नियंत्रण आहे . त्या - त्या गटातील सदस्यांना कोविड -१
९ च्या नियंत्रणासाठी देखील या प्रत्यक्षातील सभेचा निश्चित उपयोग होऊन कोरोना
आटोक्यात आणण्यासाठी योग्य ते योगदान देता येईल , यातून
आपल्या जिल्हा परिषदेची प्रतिमा उंचावली जाईल . आपला जिल्हा परिषदेचा कारभार
अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून
त्यावर उपाय योजना करण्याची दिशाही आपल्याला मिळेल असेही म्हट्ले आहे.
0 टिप्पण्या