लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
बुलढाणा : -आटोक्यात येत असलेला कोरोना विषाणूचा आता पुन्हा एकदा अनेक ठिकाणी उद्रेक होऊ लागला आहे. ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत तोंडावर मास्क न वापरता जमा होणारी गर्दी, नागरिकांचा बेशिस्तपणा आणि प्रशासनाचा दिवसेंदिवस होत असलेला निष्काळजीपणा कोरोनाचा उद्रेक होण्यास मुख्य कारण आहे.
कोरोना लसीचे लसीकरण सुरु झाले असले तरी अद्याप कोरोनाचे संकट टळलेले हे प्रत्येकाने लक्षात घेणे आत्यावश्यक आहे. बुलढाणा जिल्ह्यात संचारबंदी जारी करण्यात आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज बुधवार एकाच दिवशी सर्वाधिक म्हणजे १९९ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली असून जिल्ह्यात संचारबंदी जारी करण्यात आहे. तर लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद करण्यात आलेली आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवड्यापासूनच कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. तर आज एकाच दिवशी १९९ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या आदेशाने शाळा महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आली असून शिवजयंतीच्या मिरवणुकाही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच लग्न समारंभाला ५० लोकांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १५,२२५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले.
0 टिप्पण्या