Ticker

मालेवाडीच्या सरपंचपदी आजिनाथ दराडे तर उपसरपंचपदी सुनील खेडकर यांची निवड

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मालेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आजिनाथ दराडे


तर उपसरपंचपदी सुनील खेडकर यांची निवड करण्यात आली आहे.  ११ सदस्य सख्या असणाऱ्या या ग्रामपंचायत मध्ये सरपंच उपसरपंच निवडीत 

 सुनील खेडकर यांच्या पॅनलकडे ६ सदस्य झाल्याने त्यांच्या पॅनल चे बहुमत झाले  निवडणुक अधिकारी म्हणुन  बाळासाहेब  येवळे यांनी काम पाहिले मालेवाडी ग्रामपंचायत निवडणुक झाल्यानतंर ही सदस्य फोडाफोडीचे नाटयमय वातावरण घडले  तरी  किरण खेडकर प्रणित भगवानबाबा ग्रामविकास पॅनलने सहा ठिकाणी विजय मिळवत बहुमत प्राप्त करत बाजी मारली 

सदस्य फोडाफोडीमुळे येथिल तणावपुर्ण वातावरणामुळे या गावच्या सरपंच  निवडी कडे पाथर्डी तालुक्याचे लक्ष होते  सरपंच निवडी नतंर          सर्व स्तरातून या निवडीचे स्वागत झाले  अनेकांनी सरपंच व उपसरपंचांचे प्रत्यक्ष अभिनंदन केले आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याच्या भावना यावेळी नवनियुक्त सरपंच व उपसरपंचानी व्यक्त केल्या.तसेच निवडणुकीतील वादविवाद हेवेदावे विसरून गावाच्या विकासासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करू असे आश्वासन पॅनलप्रमुख किरण खेडकर यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या