Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव नगरपरिषदेवर प्रशासक नियुक्त

 

लोकनेता न्यूज 

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 शेवगाव :- शेवगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ रविवार ( दि.७ ) रोजी संपुष्टात आल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शेवगाव नगरपरिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असुन उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण प्रशासक म्हणुन या परिषदेचा कारभार पाहणार आहेत. 

    या नगरपरिषदेच्या निवडणुक संदर्भात मतदांर यादीचा कार्यक्रम जाहीर झाला असुन प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर फेब्रूवारी महिन्यात निवडणुक होईल असा अंदाज वर्तविला जात असताणा ही निवडणुक लांबणीवर पडली आहे. परिषद पदाधिकारी व नगरसेवक यांची मुदत संपली असुन आता नवनिर्वाचीत सदस्यांची पहिली बैठक होइपर्यंत प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण हे कारभार पाहणार आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या