लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर:- अहमदनगर म्हणजे
नाविन्यपूर्ण गोष्टींची खाण आहे.आज येथे विविध विषयांवर 'मराठी वेब
सिरीज तयार होत असुन अशीच लव,लोचा,लफडं ही सागर खिस्ती लिखित आणि कल्पतरू अँग्रो फुड प्रोडक्ट निर्मित
असणारी ही मराठी वेब सिरीज नक्कीच लोकांना आवडेल कारण या वेब सिरीज मध्ये ग्रामीण
विनोदाचा महाबार पहायला मिळणार आहे. असे वक्तव्य अपघात सहायता संघाचे राज्य
अध्यक्ष डॉ राजेश जाधव यांनी लव,लोचा,लफडं
या मराठी वेब सिरीजच्या संहिता पुजन आणि प्रथम चित्रण प्रसंगी बोलताना केले.
गणेश जयंतीचे औचित्य
साधत सागर खिस्ती लिखित आणि रवी त्रिभुवन दिग्दर्शित लव,लोचा,
लफडं, या मराठी वेब सिरीज चे चित्रिकरण सुरु
करण्यात आले. या वेळी माझं नगर ठेवा इतिहासाचा या पहिल्या नगर मधील इतिहास सिरीज च
निर्मिते प्रकाश साळवी, मिसाळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती
हा कार्यक्रम घेण्यात आला. नगर मध्ये भरारी घेणाऱ्या कल्पक कलाकार आणि मेहनत
करणाऱ्यांना सर्वत्र नक्कीच यश प्राप्त होते हे आता सिद्ध झाले असून हि मराठी
सिरीज नक्कीच महाराष्ट्रात स्वतः चा स्वतंत्र ठसा निर्माण करिल असे आपल्या
शुभेच्छा वक्तव्यात प्रकाश साळवी यांनी सांगितले .
याप्रसंगी मनिषा लहारे,सौ.घोलप,रुपेश चव्हाण, पुरुषोत्तम उपाध्यय,श्रद्धा थोरात, करिष्मा आंग्रे, अभिषेक आंग्रे, साक्षी भालेराव, दुर्गेश पाथरकर , गाडेकर मँडम, सागर हरके,विशाल जोशी, समृद्धी
खिस्ती,यांच्या सह या वेबसिरीज मधील कलाकार उपस्थित होते. ज्योती खिस्ती यांनी या वेबसिरीज संदर्भात तयारी आणि
लोकांपर्यंत कसे जाणार याविषयी माहिती दिली या प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांनी
शुभेच्छा दिल्या तर आभार रवी त्रिभुवन यांनी मानले.
0 टिप्पण्या