लोकनेता न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अहमदनगर ः विकास कामातून शहराचा चेहरा -मोहरा बदलायचा आहे. यासाठी अधिकारी, ठेकेदार यांनी कामाच्या दर्जेकडे लक्ष द्यावे. याचबरोबर कामांमध्ये दिरंगाई टाळून गती द्यावी व लवकरात लवकर पूर्ण करावे. कामांमध्ये कोणी कामचुकारपणा केल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी यावेळी ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिला .
शहरामध्ये फेज 2 व अमृत भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तसेच काही रस्त्यांच्या पॅचिंगच्या कामास सुरुवात झाली आहे. दिल्ली गेट ते नेप्ती नाकापर्यंतच्या रस्ता कॉक्रिटीकरणावर डांबरीकरणाचा थर देण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच या रस्त्याच्या रुंदीकरण भागात डांबरीकरण करण्यात येणार आहे.
बागरोजा हाडको कॉर्नर ते बालिकाश्रमरोडला जोडणार्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली असून, लवकरच या रस्त्याच्या कॉँक्रिटकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. विकास कामातून शहराचे रुप बदलायचे आहे. यासाठी अधिकारी, ठेकेदार यांनी कामाच्या दर्जेकडे लक्ष द्यावे. याचबरोबर कामांमध्ये दिरंगाई टाळून गती द्यावी व लवकरात लवकर पूर्ण करावे. कामांमध्ये कोणी कामचुकारपणा केल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल, असे प्रतिपादान आ. संग्राम जगताप यांनी केले.यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे कामे मंजूर असून या कामांना गती द्यावी. नगर शहर आता आपल्या सर्वांना मिळून विकास कामातून बदलायचे आहे. विकास कामामध्ये सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आ. संग्राम जगताप. समवेत उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, प्रा. अरविंद शिंदे, शहर अभियंता सुरेश इथापे, इंजि. रोहिदास सातपुते, श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखी, वैभव वाघ, राम वाघ, काका शेळके, गणेश दातरंगे, हरिभाऊ येलदंडी, सनी आगरकर, सनी शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या