लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
बीड : - जिएसटीचा जाचक कायदा व अटीच्या विरोधात येत्या २६ फेब्रुवारी २०२१ रोजी संपूर्ण भारत बंद ठेवला जाणार असुन या संदर्भात आज बुधवार २४ फेब्रुवारी २०२१ रोजी बीड शहरातील वैष्णवी पॅलेस येथे बीड जिल्हा व्यापारी संघटनाची बैठक पार पडली.
या बैठकीत येत्या २६ फेब्रुवारी रोजीच्या भारत बंदला जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी पाठींबा दिला असुन बंदमध्ये सहभागी होण्याचा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व्यापारी संघटना सहभागी असणार आहेत.
आजच्या बैठकीत सि.ए.बी.बी जाधव व लड्डा यांनी व्यापाऱ्यांना जिएसटीच्या बदलत्या नियमाच्या व व्यापारी वर्गावर होणाऱ्या त्याच्या परिणामाची माहिती दिली.या बैठकीस सर्व व्यापारी संघटनाचे पदाधिकारी व व्यापारी उपस्थीत होते. येत्या २६ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या भारत बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे
0 टिप्पण्या