लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई : गेल्या
वीस दिवसांपासून आंदोलन करणारे विनाअनुदानित शिक्षक आज आक्रमक झाले आणि त्यांनी
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर हे आंदोलन केलं. संध्याकाळी सातच्या
सुमारास शेकडो शिक्षक वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यासमोर दाखल झाले आणि त्यांनी
ठिय्या मांडला. यानंतर पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन आझाद मैदानावर
रवानगी केली आहे.
विनाअनुदानित
शिक्षकांना अनुदान मिळावे यासाठी राज्यभरातील शिक्षक गेल्या वीस दिवसापासून आझाद
मैदानावर आंदोलन करत आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय होईल अशी
शिक्षकांची अपेक्षा होती. मात्र निर्णय झाला नसल्याने आक्रमक झालेल्या शिक्षकांनी
वर्षा गायकवाड यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर तिया मांडला परंतु पोलिसांनी सर्व
आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी आझाद मैदानावर केली आहे
0 टिप्पण्या