Ticker

6/Breaking/ticker-posts

भाभीजी घर पर है या मालिकेत आता नेहाची एंट्री .. !

 

लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

मुंबई : अनेक वर्षांपासून सुरु असलेली मालिका ‘भाभीजी घर पर है!’ आज घराघरामध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र रसिकांच्या मनात लोकप्रिय झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सौम्या टंडन या मालिकेत काम करत होती. तिने अनिता भाभीची भूमिका लोकप्रिय केली होती. खाजगी कारणांमुळे काही दिवसांपूर्वीच सौम्याने ही मालिका सोडली होती. सौम्याने घेतलेल्या या निर्णयामुळे निर्मात्यांची झोप उडाली होती. त्यानंतर अनिता भाभीच्या भूमिकेसाठी अनेक नावांची चर्चा झाली. पण नेहाचे नाव फायनल झाल्याने तिची एंट्री झाली आहे.

नेहा पेंडसेने मालिकेच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे. दोन आठवड्या पूर्वी सेटवर पहिल्याच दिवशी मालिकेच्या टीमकडून तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. केक कटींग करत मालिकेच्या कलाकारांनी तिचे स्वागत केले. नेहा पेंडसेही कलाकारांचे प्रेम पाहून भारावून गेली होती.तिने आपला हा आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला. भाभीजी घर पर है च्या माध्यमातून नेहा पेंडसे आता अनिता भाभी बनत रसिकांच्या भेटीला येणार आहे. या भूमिकेसाठी नेहादेखील खुप उत्सुक आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी दोनही ठिकाणी काम केले आहे. ‘बिग बॉस12’ मध्ये ही नेहा दिसली होती. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नेहा सिनेमातही झळकणार आहे. नेहा सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते. नुकतंच नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या