लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
सोनई :- भारतीय आयुर्विमा
महामंडळाच्या वतीने सोनई येथील राजेंद्र नारायण सानप यांना 'एम डी आर
टी'सन्मान जाहीर होवून त्यांना अमेरिकात होत असलेल्या जागतिक
विमा परिषद मध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
एलआयसीचा
एम.डी.आर.टी २०२१ हा सन्मान विमा विश्वातील अत्यंत मानाचा समजला जातो. हा सन्मान
मिळालेल्या विमा प्रतिनिधीस अमेरीकेत होणाऱ्या विमा परिषदेस एलआयसी ऑफ इंडिया च्या
वतीने प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते.सानप हे शेवगाव शाखेत सन १९९५ पासून विमा
प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत,यापूर्वी त्यांना विविध
योजनेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ग्रामीण
भागातील लोकांना विमा व बचतीचे महत्व सांगत त्यांनी काम केले आहे.
मानाचा
एलआयसी पुरस्कार व अमेरिकेत प्रतिनिधित्व मिळाल्याबद्दल त्यांचे पुणे विभागाचे
विभागीय प्रबंधक बरूनकुमार विपणन प्रबंधक नंदासाहेब,वरिष्ठ शाखाधिकारी श्रीनिवास डंके, सुरेश गायकवाड सह परीसरातील ग्रामस्थांनी
अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या