Ticker

6/Breaking/ticker-posts

मंत्री राजेंद्र शिंगणे - गृहराज्यमंत्री सतेज पाटील कोरोना पॉझिटिव्ह

 

लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


 

मुंबई : अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेंद्र शिंगणे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भातील प्रमुख नेत्यांपैकी ते आहेत. दरम्यान, महाविकासआघाडी सरकारमध्ये राजेंद्र शिंगणे यांनी पाचव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली.

 

गृहराज्यमंत्री सतेज पाटील कोरोना बाधित

काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना 9 फेब्रुवारीला कोरोनाची  लागण झाली होती. सतेज पाटील यांनी त्याबाबत ट्विट करुन माहिती दिली. कोरोनावर मात करुन लवकरच आपल्या सेवेसाठी हजर होईन, असं सतेज पाटील म्हणाले आहेत.

 

गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनामुक्त

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याचं 2 फेब्रुवारीला समोर आलं होतं. गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. अनिल देशमुख कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या