लोकनेता न्यूज ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकार काही महत्त्वाचे
पाऊलं उचणार असल्याचे संकेत राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री
विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. राज्यात
पुन्हा लॉकडाऊन करणं हे आर्थिक दृष्टीकोनाने राज्याला परवडणारं नाही. त्यामुळे
सरकार पर्यायी मार्ग काढण्यावर भर देत असल्यांचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
राज्यात पुढच्या दोन महिन्यांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा येऊ घातल्या
आहेत. या परीक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे.
मात्र, सध्या या परीक्षांवर कोरोनाचं सावट आहे. या
परीक्षांवर योग्य पर्यायी मार्ग काढणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
वडेट्टीवार यांनी नेमकं काय सांगितलं?
कोरोना रुग्णांची वाढती संख्या व परिणामी सम्भाव्य लॉकडाऊन राज्याला आणि एकूण अर्थकारणाला लॉकडाऊन परवडणारे नाही. मात्र लॉकडाऊन टाळण्यासाठी लोकलच्या फेऱ्या कमी करणे, एसटी बसेसमधील गर्दी कमी करणे आदी शक्यतांची पडताळणी केली जात आहे. सिनेमागृहे- मंगल कार्यालयात होणाऱ्या गर्दीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मत्हत्वाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे आणि ऑनलाईन परीक्षा घेणे याबाबतही चाचपणी सुरू आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर येत्या काळात हे निर्णय अपेक्षित असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले . त्यामुुळे १० वी व १२ वी च्या परीक्षा न होताच पास करण्यावर विचार सुरू आहे.
0 टिप्पण्या