लोकनेता न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर' शब्दावर वारंवार जोर दिला. आता याच आत्मनिर्भर शब्दाची निवड 'ऑक्सफोर्ड लँग्वेजेस'ने हिंदी वर्ड ऑफ ईयर 2020 म्हणून केली आहे. या शब्दाची निवड भाषा तज्ज्ञ कृतिक अग्रवाल, पूनम निगम सहाय आणि इमोगन फॉक्सेल यांच्या पॅनेलने केली आहे.
ऑक्सफोर्ड हिंदी ऑफ द ईयर काय आहे?
ऑक्सफोर्ड हिंदी वर्ड ऑफ द ईयर हा एक शब्द किंवा अभिव्यक्ती आहे. मागील वर्षीच्या निती, मनोवृत्ती किंवा परिस्थिती प्रतिबिंबित करण्यासाठी एखाद्या शब्दाची निवड केली जाते. तसेच सांस्कृतिक महत्त्व असलेले शब्द म्हणून आणि दीर्घकाळ टिकण्याची क्षमता आहे, अशा शब्दाची निवड यामध्ये केली जाते.
ऑक्सफोर्ड लँग्वेजने काय म्हटलं?
'ऑक्सफोर्ड लँग्वेज' ने म्हटलं ,भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड 19 च्या विरूद्ध लढण्यासाठी आर्थिक पॅकची घोषना केली होती ,बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, कोरोना महामारीला सामोरं जात असताना एका देशाला अर्थव्यवस्थेच्या रुपात, एक समाज म्हणून आत्मनिर्भर राहण्यावर भर दिला गेला पाहिजे. त्यानंतरच 'आत्मनिर्भर भारत' या शब्दाचा वापर भारताच्या सार्वजनिक शब्दकोशात एक वाक्प्रचार आणि संकल्पना म्हणून वाढला.
कोविड -19 ची लस निर्मिती मोठं यश
आत्मनिर्भर भारत मोहिमेचे मोठे यश म्हणजे कोविड 19 लसीचं देशात निर्मिती करणे होय. प्रजासत्ताक दिनी, राजपथवर आत्मनिर्भर भारत अभियानाची रूपरेषा दर्शवताना एक चित्ररथ देखील आला होता.
अडचणींशी लढण्यासाठी हा शब्द सामर्थ्य देतो
. कोरोनामुळे प्रभावित अर्थव्यवस्थेला हाताळण्यासाठी शस्त्रास्त्र हा शब्द वापरला गेला. तरुण आणि वृद्धांना अनेक अडचणींचा सामना करण्यासाठी यामुळे सामर्थ्य मिळते. यापूर्वी 2017 मध्ये 'आधार', 2018 मध्ये 'नारी शक्ती' आणि 2019 मध्ये 'संविधान' या शब्दांची निवड ऑक्सफोर्डने हिंदी भाषेतील शब्द म्हणून केली होती.
0 टिप्पण्या