Ticker

6/Breaking/ticker-posts

‘ज्ञानेश्वर’च्या तज्ज्ञ संचालकपदी डॉ.क्षितिज घुले

 


लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 भेंडा :- ज्ञानेश्वर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी डॉ.क्षितिज घुले यांची निवड करण्यात आली आहे. अभ्यासु युवा व्यक्तीमत्व म्हणुन त्यांची ओळख असून आता तज्ज्ञ  संचालक झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ  संचालकपदी शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांची निवड करण्यात आली. 

कारखान्याच्या संचालक मंडळाची सर्व प्रथम बिनविरोध निवड झाली. त्यानंतर चेअरमनपदी मा.आमदार नरेंद्र घुले पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी पाडूंरग अंभग यांची एकमताने निवड झाली आहे.
       सभापती डॉ. क्षितिज घुले हे राजकारणात सक्रिय असुन त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातुन तालुक्यात अनेक विकासकामे हाती घेतली आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न, अनुदान, विमा अशा प्रश्नांचा पाठपुरावा केल्याने ते मार्गी लागले आहेत. आता 
तज्ज्ञ 
 संचालक झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निवडी बद्दल त्यांचे ज्ञानेश्वर कारखान्याचे सर्व संचालक, बाजार समिती सभापती अॅड अनिल मडके,रा.कॉ.जिल्हा युवा कार्याध्यक्ष संजय कोळगे, तालुकाध्यक्ष कल्यान नेमाने, ताहेर पटेल, कृष्णा सातपुते,  शफीक सय्यद यांचे सह   कार्यकर्ते, आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या