Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा शल्य चिकित्सक व शासकीय रुग्णालय गरिबांचे प्राणदाता..! - पद्मश्री पवार

 



लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर:-  "करोनाशी लढताना मागील वर्षभरात अहमदनगरचे   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शासकीय रुग्णालयाने हजारो गरीब रुग्णांचे प्राण वाचवले. यामागे जिल्हा शासकीय आणि ग्रामीण रुग्णालय टीम , डॉ. पोखरणा यांचे असामान्य धैर्य ,निर्णय आणि संघटन कौशल्य होते "असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी आज येथे केले.

 स्नेहांकुर उपक्रमाच्या   केडगाव येथील रूपाली मुनोत बालकल्याण संकुलात आज 3 बालकांचे एकत्रित दत्तक विधान करण्यात आले. यानिमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील कोवीड योद्ध्यांचा सेनापतीम्हणून अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या डॉ. पोखरणा यांचा  सर्व सामाजिक संस्थासंघटनांतर्फे पद्मश्री पवार यांच्या हस्ते नागरी गौरव करण्यात आला. डॉ. सौ. माधवी अजित लोकरे या अहमदनगरच्या भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत.  

 कोल्हापूर येथे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत  त्वचारोग  आणि आधुनिक लेझर सौंदर्यसाधना केंद्र डॉ. सौ.लोकरे चालवतात.केवळ श्रीमंतांचा शौक असलेली सौंदर्यसाधना त्यांनी मागील दीड दशकांच्या समर्पित साधनेतून सर्वसामान्यांसाठी  उपलब्ध करून दिली.हजारोंना जगण्याचा नवा आत्मविश्वास देणाऱ्या डॉ. सौ. लोकरे यांचाही यावेळी नगरकरांतर्फे  गौरव करण्यात आला. दत्तक  दिलेल्यातील एक बालक जन्मतः एचआयव्हीबाधित होते.  दुसरे  अत्यल्प वजनाचे आणि काही जन्मजात आजार असलेले होते. तर तिसऱ्या बालकास केवळ एकच कान आहे.यांना दत्तक  अमेरिकेतील 2 आणि  एका  भारतीय पालकाने दत्तक घेतले. यातील एक अमेरिकन दाम्पत्य कॅन्सर तज्ञ डॉक्टर असून दुसरे संगणक क्षेत्रात कार्यरत आहे.

  भारतीय दांपत्य उद्योग आणि सामाजिक कार्यात सहभागी आहे.करोना च्या पुन्हा वाढत असलेल्या संसर्गाचे पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील लोकांनी सर्व खबरदारी बाळगण्याची विनंती डॉ. पोखरणा यांनी यावेळी केली.यापूर्वी दत्तकविधान केंद्रातील अनेक मुलांच्या शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ञ म्हणून डॉ. पोखरणा यांनी केल्या होत्या. त्या आठवणी त्यांनी विशद केल्या.

डॉ. पोखरणा यांनी ज्यांच्या शस्त्रक्रिया केल्या , ती मुले दत्तक दिलेल्या कुटुंबात आनंदाने कशी राहतात ,याची चित्रफित यावेळी सर्वांनी पाहिली. सध्या आपण करवीरनगरीत सेवारत असलो , तरी अहमदनगरने दिलेले संस्कार आणि प्रेरणा हीच आपली शिदोरी असल्याचे डॉ. माधवी  लोकरे यांनी नमूद केले. यावेळी समाज कल्याण विभागाचे मराठवाडा विभागाचे उपायुक्त पांडुरंग वाबळे , महाराष्ट्राचे माजी पाटबंधारे सचिव किसनराव शिंदेपुणे येथील प्रख्यात विकासक राहुल शिंदेअमोल जाधवप्रदीप काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब वारुळेसंतोष धर्माधिकारीअजय वाबळेडॉक्टर प्रीती भोम्बेभरत  कुलकर्णीअहमदनगर जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य , बाल संरक्षण अधिकारी यांनी मिळून केले होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या