लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
खरवंडी कासार :-पाथर्डी तालुक्यातिल ढाकनवाडी
ग्रामपंचायत निडणुकीत संत भगवान बाबा ग्राम विकास पॅनलने सामजिक कार्यकर्ते मोहन
दादा ढाकणे यांच्या नेतृत्व खाली विजय मिळवला.सरपंच पदी सुरेखा राजेंद्र ढाकणे,तर उपसरपंच पदी सुनील ढाकणे यांची निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय
अधिकारी म्हणुण बाळासाहेब दळवी यांनी काम पाहिले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव
ढाकणे व गयाबाई ढाकणे यांच्यासह समस्त गावकरी उपस्थित होते.
ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच
व ग्रामपंचायत सदस्य नक्कीच गावाचा विकास करतील.त्यासाठी त्यांना नियमित मार्ग
दर्शन करण्यात येईल.तसेच गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी या
काळात पूर्ण प्रयत्न करु.असे पॅनल प्रमुख मोहनराव ढाकणे म्हणाले.
1 टिप्पण्या
किती गावचा विकास होतो पाहू....?
उत्तर द्याहटवा