अ.नगर जिल्हा वाचनालयात मराठी भाषा दिन साजरा
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर :मानवी जीवनात वाचनाचे, ग्रंथाचे व लेखकांचे योगदान अमुल्य आहे. सुशिक्षित माणसाला सुसंस्कृत बनविण्याचे त्याची मानसिक जडणघडण करण्याचे काम ग्रंथ करतात. सामान्य माणसाला असामान्य करण्याचे सामर्थ्य वाचनात असल्याने उगवत्या पिढीने वाचन संस्कृती अंगिकारावी, असे आवाहन अ.नगर जिल्हा वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी केले.
याप्रसंगी उपाध्यक्ष अजित रेखी, संचालक राहुल तांबोळी, ज्योती कुलकर्णी, दिलीप पांढरे, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल, वाचक व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्तविक प्रा.ज्योती कुलकर्णी तर आभार अजित रेखी यांनी मानले
0 टिप्पण्या