लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुळा पंपिंग स्टेशन येथील पंप नादुरुस्त , पाणी पुरवठा विस्कळीत
अहमदनगर : - रविवारी शहर पाणी पुरवठा योजनेवरील मुळा पंपिंग स्टेशन येथील १ पंप नादुरुस्त झाल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. परंतु कामासाठी वेळ लागणार असल्याने पाणी उपसा बंद राहणार आहे.
कारणांमुळे सोमवार दि १५/०२/२०२१ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा . झेंडी गेट' रामचंद्र खुंट' हातमपुरा' रामचंद्र खुंट' कोठला' माळीवाडा', सारसनगर् बुरूडगाव रोड, सावेडी, पाईप लाईन रोड, इ . भागास मंगळवार दि १६/०२/२०२१ रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल.
तसेच दि. १६/२/२०२१ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा. स्टेशन रोड. विनायक नगर, सावेडी उपनगर, बालिकाश्रम रोड, इ भागास पाणी पुरवठा होणार नाही. या भागास दि. १७/०२/२०२१ रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल.
तरी वरिल सर्व परिस्थीती विचारात घेऊन नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरिने करावा व महानगर पालिकेस सहकार्य करावे . असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे .
0 टिप्पण्या