मुक्काम पोस्ट आमदार निवास मुंबई
*मुंबईतील आमदार निवासातील दृश्य .आमदार निलेश लंके यांच्या साधेपणाचे पुन्हा दर्शन
*केवळ मतदारसंघातीलच नाही तर इतरही अनेक जण मुक्कामी
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पारनेर : – आमदार निलेश लंके यांचा साधेपणा समस्त महाराष्ट्राला परिचित आहे. बुधवारी आमदार निवासात आ. लंके जमिनीवर तर कार्यकर्ते पलंगावरील गादीवर झोपल्याचे दृश्य एका कार्यकर्त्याने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात बंदिस्त केले. केवळ पारनेर नगर मतदारसंघातील नाही तर राज्यभरातील अनेक जण या ठिकाणी मुक्कामी येतात. सर्वसामान्यांना आश्रय आणि आधार देणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील आमदार म्हणजेच निलेश लंके होय. 24 तास 365 दिवस सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारे आ. लंके यांचा सामाजिक पिंड आहे. राजकारणापेक्षा समाजकारण म्हणून हे नाव पुढे आले आहे. गोरगरीबांच्या कल्याणार्थ झटणारे आमदार निलेश लंके यांनी प्रस्थापितांना धक्का देत इतिहास घडवला. त्यांच्या रूपाने सर्वसामान्य कुटुंबातील तरुण विधानसभेत पोहचला. गेल्या वर्षभरापासून आमदार म्हणून त्यांनी अनेक कामे केली. कोरोना काळात परप्रांतातील अडकलेल्या मजुरांना मदतीचा हात दिला. आज राज्यभरातून अनेक जण विविध कामासाठी आ.लंके यांना फोन केला जातो. सर्वत्र त्यांची लोकप्रियता वाढलेले आहे. आर. आर.पाटील यांच्या नंतर सर्वसामान्य कुटुंबातील आमदार म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आकाशवाणीतील त्यांच्या आमदार निवासात सर्वांना राहण्याची मुभा दिली जाते. त्यामुळे त्यांच्या निवासात सातत्याने गर्दी असते.
बुधवारी कॅबिनेटची बैठक असल्याने आमदार निलेश लंके मंगळवारी पहाटे ४ वाजता मुंबईतील आपल्या आमदार निवासात पोहोचले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून आलेले कार्यकर्ते झोपले होते. त्यांना त्यांनी उठावले नाही . कार्यकर्त्यांची झोप मोड न करता. एका कोपर्यात असलेल्या जागेत ते झोपले. कार्यकर्ते पलगांवरील गादीवर झोपलेले होते . कार्यकर्त्याने हे दृष्य आपल्या मोबाईलमध्ये क्लिक केले. शिक्षक नेते बाळासाहेब खिलारी,दत्ता आवारी,संभाजी वाळुंज,दादा दळवी हे ही त्यांच्या समवेत होते.
साधी राहणी अधिक भावणारी
आमदार निलेश लंके यांची अत्यंत साधी राहणी सर्व सामान्यांना अधिक भावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांना ही त्यांच्या राहणीने आपलेसे केले आहे. कोणताही बडेजाव पणा न करता सर्वसामान्यांमध्ये वावरणारा आमदार म्हणून त्यांची एक एक वेगळी ओळख आहे.
जमिनीवरील झोप या अगोदर ही गाजली होती
आमदार निलेश लंके जमिनीवर आणि कार्यकर्ते गादीवर हे दृश्य या अगोदरही प्रसारमाध्यमांमध्ये गाजले होते . वृत्तवाहिन्यांनी पारनेर नगरच्या आमदारांच्या साधेपणाची दखल घेतली होती. त्यामुळे निलेश लंके हे अजूनही जमिनीवरच आहेत . अशी चर्चा झडत आहे .
0 टिप्पण्या