Ticker

6/Breaking/ticker-posts

जगताप सरांनी विद्यार्थी घडविले - भामरे

 राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल मधील तंत्र शिक्षक अनिल जगताप सेवानिवृत्त 




लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर : - जगताप सर यांनी आजपर्यंतचे शाळेचे विद्यार्थी घडवले तसेच यापुढे देखील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून इलेक्ट्रिकल सुपरवायझर बनवण्याचे काम करावं असे आवाहन  अध्यक्ष स्थानावरून बोलतांना शरदचंद्र भामरे यांनी केले .

 शहरातील स्टेशन रोड येथील जिल्हा सहकारी बँकेचे समोरील राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल चे तांत्रिक विभागातील निर्देशक श्री अनिल परशुराम जगताप हे प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक 28/02/ 2021 रोजी सेवानिवृत्त झाले , संस्थेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला .

  राष्ट्रीय शिक्षण मंडळ व राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल यांच्या वतीने मंडळाचे सदस्य श्री शरदराव भामरे मुख्याध्यापक श्री जगन्नाथ बोडखे यांच्या हस्ते श्री अनिल जगताप यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री कैलास पोटे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री मधुकर तांदळे व श्री जगताप कुटुंबीय उपस्थित होते .

यावेळी मुख्याध्यापक श्री जगन्नाथ बोडखे  बोलताना सांगितले की , अनिल जगताप सर यांनी अल्यंत समर्पक भावनेने विद्यालयचे कार्य केले अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी घडवले ,म्हणूनच ते अत्यंत समाधानाने सेवानिवृत्त होत आहेत . अनिल जगताप यांचा सत्कार माजी मुख्याध्यापक मधुकर तांदळे , बन्सी ननवरे . बाळकृष्ण पात्रे आयुब सय्यद तसेच चांद सुलतान हायस्कूलच्या शिक्षकांनी सत्कार केला . कलाशिक्षक श्री बोटे यांनी चित्र भेट दिले .

 सत्काराला उत्तर देताना श्री अनिल जगताप खूप भावनिक होऊन म्हणाले की राष्ट्रीय शिक्षण मंडळ संस्थेच्या सर्व सदस्यांनी नोकरीमध्ये अत्यंत सहकार्य केले विशेषतः संस्थेचे सेक्रेटरी अॅड.विद्याधर काकडे . जिल्हा परिषद सदस्या सौ हर्षदाताई काकडे यांनी नेहमी मदत करुन मार्गदर्शन केले . अॅड.विद्याधर काकडे यांच्या नेतृत्वाने संस्थेस भरभराटीचे दिवस आले मी या संस्थेचा सदैव ऋणी राहील व शाळेसाठी निवृत्तीनंतरही माझे योगदान देत राहील असे  जगताप म्हणाले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री शिक्षक संजय सकट यांनी केले तर आभार श्री प्रवीण ऊकिर्डे यांनी मानले . यावेळी श्री जगताप यांचे कुटुंबीय व नातेवाईक तसेच शिक्षक बाबासाहेब लोंढे , सतीश काळे रामनाथ घनवट ,कविराज बोटे,सुशील नन्नवरे,आबासाहेब बेडके, वस्तीगृहाचे अधीक्षक संजय बोबडे,अशोक चव्हाण , तुकाराम विघ्ने, विजय वाणी .निवृत्त कर्मचारी शिरसे . वनराज ढवळे आदी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या