लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
सिंधुदुर्गः महाराष्ट्राचे ‘दबंग’ नेते म्हणून नारायण
राणे यांची ओळख आहे. अनेक लोकं स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं हे सोपं असतं. पण
स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरुन ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात, त्यातील
नारायण राणे हे एक, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी
नारायण राणे यांचं कौतुक केलं आहे.
नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे आज केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झालं. याकार्यक्रमाला भाजप
नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे नेते उपस्थित
होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचं भरभरुन कौतुक केलं आहे.
प्न पाहणं सोपे असते. पण, स्वप्नपूर्तीसाठी
झोप विसरुन काम करणे, हे अधिक धाडसी असते. हे मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी नारायण
राणे यांनी असेच धाडस केले आहे. मी त्यांचा संघर्ष जवळून पाहिला आहे, अशा शब्दांत देवेंद्र
फडणवीस यांनी राणेंचं कौतुक केलं आहे.
करोनामुळे आरोग्य व्यवस्था हा ऐरणीवरचा
विषय आहे. त्यामुळेच या अर्थसंकल्पात आरोग्यावर अधिक भर देण्यात आला आहे. २८ हजार प्राथमिक
आरोग्य केंद्रांना अद्ययावत करण्यात येणार आहे. हे सारे करीत असताना अधिकाधिक डॉक्टरांची
गरज भासणार आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
0 टिप्पण्या