लोकनेता न्यूज
नगर :प्रत्येक पालक हा आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपल्याला ज्या अडीअडचणी आल्या त्या मुलांना येऊ नये, त्यांनी उच्च शिक्षित व्हावे, मोठे व्हावे, नाव कमवावे, यासाठी धडपडत असतो. मुलंही आपल्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करतात. हमालमाथाडी कामगारही आपल्या मुलांच्या वाट्याला कष्टाचे काम येऊ नये, त्यासाठी स्वत:कष्ट करुन त्यांना उच्च शिक्षित करत आहेत. आज समाधान शिवाजी गीते याने सी.ए. होऊन तर सतीश परमेश्वर गीते याने वकिल होऊन आपल्या हमाल वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. मुलांवर चांगले संस्कार आणि शिक्षण दिल्यास मुलंही जीवनात यशस्वी होतात हे यातून दिसून येते. हमाल पंचायतीच्यावतीने नेहमीच हमाल-मापाडी यांच्या प्रश्नांबरोबरच त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत केली आहे. त्यांच्या मुलांकडे विशेष लक्ष देऊन मार्गदर्शन केले आहे. आज ही उच्चशिक्षित मुलं हमाल पंचायतचा अभिमान असल्याचा प्रतिपादन जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.
जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने सी.ए. परिक्षेत समाधान शिवाजी गिते तर वकिली परिक्षेत सतीश परमेश्वर गिते उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकाण, बहिरु कोतकर, रविंद्र भोसले, सुनिल गिते, पांडूरंग चक्रनारायण, नाथा कोतकर, राहुल घोडेस्वर, वाल्मिक सांगळे, नवनाथ बडे, शिवाजी गिते, निलेश कानडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी गोविंद सांगळे म्हणाले, हमाल पंचायतीच्यावतीने हमाल-मापाडी यांच्या प्रश्नांसाठी लढा देत असते. त्याच बरोबर त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असतात. हमाल-मापाडी यांचे मुलंही आज उच्च शिक्षित होत आहेत, त्यांना प्रोत्साहन देऊन हमाल पंचायत त्यांना मदतीचा हात देत आहे. यशस्वी झालेले समाधान गिते व सतीश गिते यांनी मोठ्या कष्टाने ही पदवी संपादन केली, ही आम्हा सर्वांसाठी कौतुकास्पद बाब असल्याचे सांगून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सचिव मधुकर केकाण यांनी हमाल पंचायतीच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन यशस्वी पाल्यांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहिरु कोतकर यांनी केले तर आभार रविंद्र भोसले यांनी मानले. यावेळी राजू गिते, श्रीधर गिते, जालिंदर नरवडे, तबाजी कार्ले, अर्जुन शिंदे, सुनिल गिते, नवनाथ लोंढे, राम पानसंबळ, राजू चोरमले, लता बरेलिया आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या