नेवासा पंचायत समितीला मंजूर झालेल्या डेमो
हाऊसचे सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते भूमिपूजन
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नेवासे: नामदार शंकरराव गडाख
यांच्या मार्गदर्शनाखाली महाआवास अभियान अंतर्गत नेवासा पंचायत समितीला मंजूर
झालेल्या डेमो हाऊसचे भूमिपूजन पंचायत समितीच्या माजी सभापती व नेवासा तालुका
महिला बचत गटाच्या मार्गदर्शक सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.डेमो
हाऊसचे मॉडेल घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे
प्रतिपादन सौ. सुनीताताई गडाख यांनी यावेळी बोलताना केले.
नेवासे
पंचायत समितीच्या आवारात झालेल्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी सौ.सुनीताताई गडाख,
राजनंदिनी मंडलिक,सौ.सविता झगरे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन,गणेश पवार,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,सभापती रावसाहेब कांगुणे,माजी सभापती कारभारी जावळे,उपसभापती किशोर जोजार,
सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप,पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब सोनवणे, विक्रम
चौधरी, विजय शेरकर,कारभारी डफळ,कैलास झगरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती रावसाहेब कांगुणे
म्हणाले की महाआवास अभियान अंतर्गत नेवासा पंचायत समितीला डेमो हाऊस मंजूर झालेले
आहे घरकुल कसे असते त्याच्या आत काय काय सुविधा असल्या पाहिजे याची माहिती व घरकुल
मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मिळावी म्हणून डेमो हाऊसची निर्मिती असल्याचे
सांगितले.
यावेळी बोलताना सौ.सुनीताताई गडाख म्हणाल्या
की घरकुल मंजूर करण्यात नेवासा तालुक्याने याआधीच आघाडी घेतली आहे हे सर्व
पदाधिकारी व अधिकारी यांनी केलेल्या पाठपुराव्याचे फळ आहे नामदार शंकरराव गडाख
साहेबांनी देखील यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. असे सांगून त्यांनी घरकुल मंजुरीसाठी कष्ट
घेणाऱ्या अधिकाऱ्यांसह सरपंच,ग्रामसेवक,ग्रामपंचायत
सदस्य यांना धन्यवाद दिले.घरकुल कसे असावे याचे मॉडेल असलेले डेमो हाऊस हे पंचायत
समितीच्या प्रांगणात उभारण्यात येणार असल्याने ते घरकुल मंजूर झालेल्या
लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बन्सीभाऊ आगळे,बांधकाम विभागाचे
इंजिनियर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या