Ticker

6/Breaking/ticker-posts

जबरदस्त फीचर्सचा स्मार्टफोन: स्वस्तात खरेदीची संधी, आज दुपारी १२ वा.सेल

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः जर तुम्हाला गेल्यावेळीच्या सेलमध्ये पोकोचा हा बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळाली नसेल तर Poco M3 ला आज डिस्काउंट सोबत खरेदी करण्याची संधी आहे. कंपनी या फोनला आज फ्लिपकार्टवर उपलब्ध करणार आहे. या सेलची सुरुवात आज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या या फोनची सुरुवातीची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे.

सेलमध्ये या फोनला आकर्षक बँक ऑफर सोबत खरेदी करता येऊ शकते. जर तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास ग्राहकांना ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळणार आहे. तर बँक ऑफ बडोदा मास्टरकार्ड वरून पहिल्यांदा शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना या सेलमध्ये फोनच्या किंमतीवर १० टक्के सूट मिळणार आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआय २ हजार रुपयांच्या किंमतीवर खरेदी करता येऊ शकते. एक्सचेंज ऑफर पोको एम ३ खरेदीवर ११ हजार २०० रुपयांचा फायदा मिळणार आहे.

फोनची खास वैशिष्ट्ये-

*४८ मेगापिक्सलचा कॅमेरा * 6000mAh बॅटरी * १८ वॉट फास्ट चार्जिंग * अशा जबरदस्त फीचर्सचा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आज ग्राहकांना मिळणार आहे. कंपनी * Poco M3 स्मार्टफोनला आज फ्लिपकार्टवर डिस्काउंट सोबत विक्री करणार आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑप्शन सोबत येणाऱ्या या फोनमध्ये ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ६६२ एसओसी प्रोसेसर दिला आहे. ड्यूल नॅनो सिम सपोर्टचा हा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड MIUI 12 वर काम करतो. या फोनमध्ये 1080x2340 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे.

 

पोकोच्या या फोनमध्ये रियरमध्ये फोटोग्राफीसाठी तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सोबत एक २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 6000mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. कनेक्टिविटीसाठी यात 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी टाइप-C आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या