नाशिक विभागीय पतसंस्थांच्या सहकार संवाद कार्यशाळेस मोठा
प्रतिसाद
लोकनेता न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, नाशिक विभागीय
पतसंस्था फेडरेशन व नगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या वतीने नाशिक
विभागातील पतसंस्थांच्या सहकर संवाद कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी आ. सुधीर तांबे
बोलत होते. प्रथम सत्रात कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय सहनिबंधक राजेंद्र शहा
यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, पतसंस्था स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, पतसंस्था
फेडरेशचे महासचिव शांतीलाल सिंगी, कर्याध्यक्ष राजुदास जाधव,
उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, खजिनदार
दादाराव तुपकर आदींसह नगर, नाशिक, जळगाव,
धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पतसंस्थांचे
सुमारे ७०० प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी काका कोयटे म्हणाले, राज्यातील सहकारी
पतसंस्थांमधून आता लवकरच स्वतःचे सहकार क्रेडीट कार्ड, मोबाईल
क्यूआर कोड मार्फत व्यवहार अशा अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त सेवा ग्राहकांसाठी
सुरु करणार आहे. मात्र राज्य सरकार कडून आम्हाला सहकार्य मिळत नाहीये. बँकांच्या
ठेवींना विमा संरक्षण आहे, मग पतसंस्थांच्या ठेवींना का नाही
? पतसंस्थांवर नियामक मंडळ लादून अंशदान वसूल करण्याचा जाचक
निर्णय सरकारने घेतला आहे. त्यास आमचा तीव्र विरोध आहे. पतसंस्थांच्या अनेक
मागण्यांकडे वर्षानुवर्ष प्रत्तेक सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता शांत न
बसता सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही बेमुदत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत
सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या धर्तीवर राज्यातील सर्व पतसंस्था येत्या
एप्रिल महिन्यात मुंबईत बेमुदत मोठे आंदोलन करणार आहे. राज्यातील हजारो
पतसंस्थांचे लाखो पदाधिकारी व कर्मचारी मंत्र्यालायावर धडक देणार आहे. आ.सुधीर तांबे
हे पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांनी आमच्या समस्या सरकार पर्यंत
पोहचाव्यात.
यावेळी सहनिबंधक राजेंद्र शहा यांनी बहुमोल मार्गदर्शन करत
सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. फेडरेशन कार्याध्यक्ष राजुदास जाधव
यांची यवतमाळ जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल तसेच उपकार्याध्यक्ष
सुदर्शन भालेराव यांची बुलढाणा जिल्हा भाजपच्या सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल
सन्मान करण्यात आला. नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी
प्रास्ताविकात आंदोलनात्मक भूमिका मांडली.
पतसंस्था फेडरेशनच्या व्यवस्थापिका सुरेखा लवांडे यांनी सुत्रसंचलन
केले, स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी आभार
मानले. यावेळी फेडरेशनसंचालक गोविंद अग्रवाल, अॅड. अंजली
पाटील, नारायणराव वाजे, नगर जिल्हा
फेडरेशनचे अध्यक्ष साबाजी गायकवाड, नंदुरबार फेडरेशनचे
अध्यक्ष डॉ.कांतीलाल टाटीया, धुळे फेडरेशनचे अध्यक्ष अरुण
महाले आदी उपस्थित होते. संगमनेर तालुका फेडरेशनचे अध्यक्ष बापूसाहेब टाक व
संग्राम पतसंस्थेचे अध्यक्ष राणीप्रसाद मुंदडा यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
आपणच आपली पाठ थोवावून घेवू : काका कोयेटे
करोना लॉकडाऊन काळात राज्यातील पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी
मिनी एटीएमच्या माध्यमातून सर्वसामन्य ग्राहकांना घरपोच आर्थिक सेवा दिली. एकाही
राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेने असे काम केले नाही. मात्र पतसंस्थांच्या
कर्मचाऱ्यांची कोणीच दाखल घेत पाठ थोपटली नाही. म्हणून आपणच आपली आपली पाठ थोपवून
घेवूया,
असे म्हणत सर्वाना आपली पाठ थोपवण्यास काका कोयटे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या