Ticker

6/Breaking/ticker-posts

विशेषांक लेखनातून जिवनात यशप्राप्ती - प्रा.डॉ.बाळासाहेब सागडे



(टाकळी ढोकेश्वर(ता.पारनेर)येथे श्री ढोकेश्वर महाविद्यालयात ज्ञानज्योत नियतकालिकाचे प्रकाशन प्रसंगी डाँ.बाळासाहेब सागडे,सिताराम खिलारी,प्राचार्य डॉ.लक्षण मतकर,प्रा.लक्षण कोठावळे,डॉ.शिवराम कोरडे आदी -छाया - दादा भालेकर)

लोकनेता न्यूज

 

टाकळी ढोकेश्वर:  ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) पारनेर विशेषांकाचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लेखन केले असून हा अंक पारनेर तालुक्यासाठी मार्गदर्शन ठरेल असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे  सिनेट सदस्य प्रा.डॉ.बाळासाहेब सागडे यांनी केले. टाकळी ढोकेश्वर(ता.पारनेर)येथे श्री ढोकेश्वर महाविद्यालयात ज्ञानज्योत नियतकालिकाचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.जि.म.विद्या प्रसारक समाजाचे जेष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी होते. 

    याप्रसंगी डाँ.सागडे म्हणाले की,या वार्षिक नियतकालिकात पारनेर तालुक्यातील ऐतिहासिक, सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक घडामोडीचा मागोवा घेऊन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेखन केले असून

महाविद्यालयीन  तरुण अधिक विचार संपन्न होण्यासाठी वाचन संस्कृती वाढवली तरच परिपक्व  नागरिक निर्माण होतील यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत.हा अंक पारनेर तालुक्यासाठी मार्गदर्शन ठरेल असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले. याप्रसंगी श्री.खिलारी म्हणाले की, महाविद्यालयाततील विद्यार्थी व प्राध्यापकांना आवाहन करत,पारनेर तालुक्यातील सामाजिक व आर्थिक, कृषी या समस्या, घेऊन दिशादर्शक उपक्रम हातात घ्यायला पाहिजेत. 

याप्रसंगी प्रास्ताविक नियतकालिकेचे संपादक प्रा.लक्षण कोठावळे यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लक्षण मतकर यांनी केले.तर आभार डॉ. शिवराम कोरडे मानले, या कार्यक्रमासाठी संपादक मंडळ प्रा.अनिल काळे, प्रा.नामदेव वाल्हेकर, प्रा.एकनाथ जाधव या बरोबर डॉ.विजय सुरोशी,डॉ. वैशाली गंगोत्री, प्रा.डॉ.गोकुळ मुंढे, प्रा.दादा लोखंडे यांनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या