Ticker

6/Breaking/ticker-posts

संत वामनभाऊ महाराज पुण्यतिथीस लोटला भाविकांचा जनसागर ..!

 







लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

श्रीक्षेत्र गहीनाथगड :-आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर  संतश्रेष्ठ  वामनभाऊ यांच्या ४५ व्या पुण्यतिथीनिमित्त दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला, सुमारे  पाच लाख भाविकांनी संत वामनभाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी दर्शनासाठी गडावर जाण्यास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या,  भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्यामुळे सुमारे दोन -तिन तास वाहतुकीची कोंडी झाली होती.             

 आज वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीचा मुख्य दिवस असल्यामुळे पहाटे बीडचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज पहाटे  बाबांच्या समाधीची विधीवत पूजा व अभिषेक करण्यात आले. त्या नंतर आरती होऊन आळंदी येथील ह भ प आसाराम महाराज बडे यांचे हरी किर्तन झाले. त्याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबेमाजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, मा.आ. भीमराव धोंडे,साहेबराव   नाना दरेकर, आमदार मोनिका राजळे आदी उपस्थित होते.         

बहिण -भावाची रंगली जुगलबंदी

त्यावेळी गडाचे महंत ह भ प विठ्ठल महाराज यांनी भाविकांना आशीर्वाद दिले.   या प्रसंगी  पंकजा मुंडे म्हणाल्या मी गडाची भक्त आहे, मी मंत्री असताना गडाच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होतामात्र आताच्या सरकारने अवघे दोन कोटी रुपयेचा विकास निधी दिला आहे. मी विरोधकांना विकास कामासाठी शुभेच्छा देते , असा टोला धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला.

त्यानंतर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले मी गेल्या 17 वर्षांपासून न चुकता वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी बाबांच्या समाधीची महापूजा करण्यासाठी येत आहे. मी जिल्हा परिषद सदस्य होतो, पण बाबांच्या आशीर्वादाने मी आज मंत्री झालो. मागील सरकारचे 50 कोटी रुपयाचे  बजेट होते. त्यातील दोन कोटी रुपयेचा निधी मंजूर होऊन कामास सुरुवात झाली आहे . मात्र पुढील एक वर्षात मागच्या सरकारने घोषणा केलेल्या विकास निधी पेक्षा पाच रुपये तरी जास्त या गडाला विकास निधी मंजूर करू व प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू अशी ग्वाही देतो . आम्हाला  गडाच्या विकासासाठी आशीर्वाद मिळाले आहेत जन्मभर विरोधकांकडून सेवा करण्यासाठी आम्हाला असेच आशीर्वाद  मिळो असा प्रतिटोला त्यांनीही पंकजा मुंडे यांना लगावत पुढील काळात आमच्याकडे सत्ता राहील या अर्थाने पंकजाताईच्या शुभेच्छा स्विकारून उत्तर दिले. बहिण - भावातील गडाच्या विकासासाठी रंगलेली जुगलबंदी उपस्थितांमध्ये चर्चचा विषय झाली .

आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी गड परिसरात कंपाउंड साठी 33 लाख रुपयांचा निधी येणार असल्याचे आश्वासन दिले कोरोना च्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भरणारी यात्रा दोन किलोमीटर अंतरावर भरवण्यात आली तसेच भाविकांना प्रसादाचे पाकीट वाटप करण्यात आले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या