( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर:- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नगर
तालुका तालीम सेवा संघाच्या वतीने गुरुवार दि. 18 फेब्रुवारी रोजी 64 वी वरिष्ठ
राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी
किताब लढत 2020-21 स्पर्धेसाठी कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी नगर तालुक्यातील कुस्तीगिरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर तालुका
तालीम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, सचिव बाळू भापकर, उपाध्यक्ष काशिनाथ
पळसकर, सहसचिव सुभाष नरवडे, खजिनदार किसन वाबळे, उत्तम कांडेकर, चंद्रकांत पवार
यांनी केले आहे.
0 टिप्पण्या