Ticker

6/Breaking/ticker-posts

अर्धवट कामामुळे कर्जत रोडवर कार ला अपघात

 



लोकनेता
 न्यूज ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

कर्जत :- कोंभळी - कर्जत रोडवर स्विफ्ट डिझायर गाडीला अपघात झाला असून रस्त्याच्या अर्धवट कामामुळे कार रस्त्यालगतच्या मोठ्या खड्यात कोसळली आहे. दैव बलवत्तर म्हणून चालकाला कोणतीही इजा झाली नाही. सदरील स्विफ्ट डिझायर गाडी राशीन येथील असून अहमदनगर वरून कोंभळी मार्गे राशीनच्या दिशेने जात होती. कोंभळी पासून कर्जतच्या दिशेने एक किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला.

 रस्त्याच्या अर्धवट कामामुळे खडी वरून गाडी थेट खड्ड्यात गेली. रस्त्याची उंची वाढल्याने रस्त्याच्या कडेला मोठं मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. हे खड्डे मृत्यूचे सापळे बनत आहेत. अपघात झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिक जमा झाले आहेत. या निमित्ताने अर्धवट अवस्थेत असलेले कोंभळी फाटा ते कर्जत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या