Ticker

6/Breaking/ticker-posts

काय आहे ? संजय राठोड यांचं राजीनामा पत्र..

 

लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राठोड यांनी राजीनामा सोपवला आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात अखेर संजय राठोड यांची विकेट पडल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत या सर्वांवर भाष्य केले. या पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी संजय राठोड यांनी दिलेले राजीनामा पत्र वाचून दाखवले.

 

मा. उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र. अत्यंत व्यथितपणे हे पत्र लिहित आहे. पूजा चव्हाण यांच्या मृत्यूबाबत खरं बाहेर यावं. पूजा चव्हाणच्या कुटुंबाचीही बदनामी होत आहे. मी तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असलो तरी मी आधी शिवसैनिक आहे. या प्रकरणाचा पूर्ण तपास होऊपर्यंत मी मंत्रिपदावर राहणं नैतिक नाही, म्हणून राजीनामा देत आहे.असे संजय राठोड यांनी पत्रात लिहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या