Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक. : आ.लंके यांचा करिष्मा . ! शेळके,गायकवाड विजयी

 




जिल्हा बँक निवडणुकीत आ. लंके यांचा करिष्मा फळाला ... शेळके,गायकवाड झाले विजयी




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

,पारनेर: (दादा भालेकर ) जिल्हा बँक निवडणूक जाहीर झाल्यापासून आमदार लोकनेते निलेशजी लंके यांनी पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशाचे पालन करत पक्षाने दिलेले उमेदवार हे स्वतः मीच आहे असे समजून गेले काही दिवस आपली प्रतिष्ठा पणाला लावून ही संपूर्ण निवडणूक हातात घेतली होती .

 जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक उदय गुलाबराब शेळके यांनी 105 पैकी मते 99 घेत प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांचा धुव्वा उडविला.पारनेरचे प्रशांत गायकवाड यांनी पानसरे यांचा पराभव केला आहे. 

 *सोसायटी मतदारसंघातून उदय शेळके विजयी  :-* जिल्हा बँकेच्या पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघातून उदय शेळके विजयी झालेले आहेत. जिल्हा बँकेच्या पारनेर सेवा सोसायटी मतदार संघात उदय शेळके व रामदास भोसले यांच्यात लढत झाली. या लढतीत भोसले यांना सहा मते तर शेळके यांना 99 मते पडली. शेळके विजयी झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी करताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.

*सभापती प्रशांत गायकवाड विजयी :-* 

 जिल्हा बँकेच्या बिगर शेती मतदारसंघातून गायकवाड यांना 763 तर विरोधी पानसरे यांना 574 मते मिळाली यात जिल्हा बँकेचे संचालक व श्रीगोंद्यातील दत्तात्रय पानसरे यांचा दारुण पराभव झाला आहे, पारनेर चे प्रशांत गायकवाड यांनी तब्बल 189 मतांनी  पानसरे यांचा पराभव केला आहे. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत सबाजीराव गायकवाड यांनी आपल्या व आमदार लंके यांच्या संपर्काचा फायदा घेत सर्व नेत्यांची व गटाची सांगड घालत निवडणूक एकहाती जिंकल्याचे दिसून आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या