लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप करण्यात आले . सर्वाधिक १७ जागा बिनविरोध झाल्या असून आता ४ जागासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे . चुरशीने मतदान होणार आहे. या चार जागांमध्ये कर्जत मतदार संघात अंबादास पिसाळ विरुद्ध मिनाक्षी सांळूके, नगर मतदारसंघात माजी मंत्री शिवाजी कर्डिले विरुद्ध सत्यभामाबाई बेरड, पारनेर मतदारसंघात उदय शेळके विरुद्ध रामदास भोसले तर बिगर शेती संस्थाच्या मतदार संघात प्रशांत गायकवाड विरुद्ध दत्तात्रय पानसरे यांच्यामध्ये लढत होत आहे. त्यामध्ये शिवाजीराव कर्डिले यांना कपबशी हे चिन्ह देण्यात आले आहे.
असे झाले चिन्ह वाटप ः
नगर मतदारसंघ –
शिवाजी कर्डिले – कपबशी,
सत्यभामाबाई बेरड – छत्री,
कर्जत मतदारसंघ –
अंबादास पिसाळ – विमान
मिनाक्षी सांळुके – कपबशी
पारनेर मतदारसंघ –
रामदास भोसले – विमान,
उदय शेळके – कपबशी,
बिगर शेती संस्थाचा मतदार संघ –
प्रशांत गायकवाड – कपबशी,
दत्तात्रय पानसरे – विमान
0 टिप्पण्या