लोकनेता न्यूज
श्रीरामपूर:- ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेती आणि पाणी विषयाच गाढे अभ्यासक, विचार जागर मंचचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. दौलतराव मल्हारी पवार (वय 82) याचे अल्पशा आजाराने निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते. पुणे येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. दरम्यान, पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांना श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती खालावल्याने साखर कामगार रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होत . तिथं आज (दि. 10) दुपारी एक वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी आमदार दौलतराव पवार यांच्या पश्चात पत्नी सुभद्रा, चार मुले सुधाकर, अॅड. भागवत, वैज्ञानिक डॉ. शरद व अनिल यांच्यासह सूना, नातवंडे असा परिवार आहे.
कै . पवार यांनी श्रीरामपूरची औद्योगिक वसाहत . शेती सह पिण्याचे पाणी.कामगार. आदि प्रशांवर आक्रमकपणे आंदोलन केली. आपल्या आमदारकीच्या काळात श्रीरामपूरला वैभव मिळवून देण्याचे काम केले. शेती व पाण्याच्या प्रश्नावर दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांचे बरोबर राहून आवाज उठविला. काही काळ स्व. रामराव आदिक . गोविदराव आदिक यांच्या बरोबर अनेक प्रश्नांच्या लढ्यात त्यांनी काम केले . त्यांच्या निधनाने तालुक्यासह जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे अशी श्रद्धांजली मान्यवरांनी वाहिली आहे .
0 टिप्पण्या