Ticker

6/Breaking/ticker-posts

एमआयडीसीतील इंडियन सिमलेसमध्ये आजपासून संप ?

 

लोकनेता न्यूज 

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 अ.नगर:-  येथील एमआयडीसीतील इंडियन सीमलेस कंपनीची तीन  युनिटी असून आज या तिन्ही युनिटच्या  कामगारांचे व पदाधिकार्‍यांची गेट मिटिंग संपन्न झाली व कंपनीचा  दोन वर्षांपूर्वी करार संपूनही नवीन करार  करत नसल्याने  72 तासाची वेळ देण्यात आली असून त्यानंतर आंदोलनाचे घोषणा केली जाणार आहे 

रविवारी संध्याकाळी संघटनेचे अध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांच्या अध्यक्षतेखाली नगर जिल्हा मजदूर सेनेची गेट मिटिंग झाली यामध्ये यावेळी सचिव वसंत सिंग तिन्ही  युनिटचे अध्यक्ष राजू वाकळे ,बाबा कोतकरकिरण घाडगेसह  सर्व कामगार व कंत्राटी कामगार उपस्थित होते. कंपनी व्यवस्थापन दोन वर्षापासून करार करतो म्हणतो पण  नवीन  करार करत नाही मागील वर्षी जानेवारी महिन्यात चार हजार रुपये वेतन वाढ देऊ असे आश्वासन दिले होते परंतु व्यवस्थापन दोन वर्ष सोडून एप्रिल 20 21 पासून वाढ  करू असे तोंडी सांगत आहे 

     त्यामुळे आज गेट मिटिंग घेण्यात आली व बुधवारी सकाळी आंदोलनाची दिशा ठरवून बहुतेक सर्व कामगार संपावर जाणार आहेत यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष बाबुशेठ टायरवाले  म्हणाले कोरोना  या नैसर्गिक आपत्तीत कोरुना काळात प्रत्येक कामगाराने कंपनीला पंचवीस हजार रुपये दिले मदत दिली असे कुठे कुणीही कोणत्याही  कंपनीत दिले गेले नाही.  पण माणुसकीच्या भावनेने आम्ही हे दिलेदोन वर्षापासून कंपनी नवीन करार करण्यास चालढकल करत आहे सध्या कंपनीची परिस्थिती अत्यंत चांगली असून कंपनी तरीही करार करण्यास तयार नाही त्यामुळे प्रसंगी कामगारांच्या रोषाला सुद्धा संघटनेला जावे लागले. कंपनी बंद पडू नये ही आमची इच्छा आहे आम्ही काय मारामारी करणारे नाही आहोत आम्ही शांततेच्या मार्गाने आमचा हक्क मागत होतो कंपनीतील सुमारे १५० कामगार सेवानिवृत्त झाले आहे त्याच्या जागी कंत्राटी कामगार कायम करावे हि आमची मागणी आहे येथे जर संप झाला तर कंपनीच्या जेजुरी व बारामती येथील युनिट चे कामगार पण संपावर जातील त्यामुळे व्यवस्थपणाने आम्हाला आंदोलन करायला लावू नये व करार करावा.          

सचिव वसंतसिंग म्हणाले  कोरोना असतानाही प्रसंगी पोलिसांच्या  काठ्या खाऊन कामगारांनी कंपनी चालवली आज  चीनचा मालच येत नसल्याने त्यावर बंदी असल्याने मीटर ट्यूब दर महिना 350 टनापेक्षा जास्त तुमची ट्यूब ची विक्री होत असून  कंपनी पूर्ण फायद्यात आहे  तरीही करार न करणे योग्य नाही  कोरोनामुळे  कंपनीची परिस्थिती सुधारली असून ऑर्डरही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत कंपनी व्यवस्थापन कामगारांवर दबाव आणत असून परप्रांतीय  सुरक्षा एजन्सी ला बोलून येथे सुरक्षा रक्षक  हातात दांडके घेऊन कंपनीच्या आत मध्ये ही फिरत आहेत  असे कोठेही घडत नाही.  

 
यामुळेही कामगारांमध्ये असंतोष वाढत आहे  व्यवस्थापन एकीकडे आमच्याकडे चर्चा  करते  व लगेच संध्याकाळी  जिल्हा पोलीस  जिल्हा पोलीस प्रमुखकडे जाऊन  आमच्या विरोधात खोट्या तक्रारी करतात  व आम्ही दहशत निर्माण करतो असे अर्ज देतात. दोन वर्ष आम्ही थांबलो आहोत  पण आता थांबणार नाही  आता जर करार केला नाहीत तर बुधवारी सकाळपासून आमचे आंदोलन ठरलेले आहे संघटनेच्या वतीने आंदोलन बाबतहोत असलेल्या अन्याय बाबत कामगार आयुक्त,जिल्हा पोलीस प्रमुखप्रशासन व पोलिसांना निवेदन देण्यात आलेले आहे होणाऱ्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी कंपनीची असेल असेही यावेळी सांगण्यात आले 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या