लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
माझ्या नवऱ्याला रोज टॉर्चर केलं जातंय: चित्रा वाघ
ही लाच घेतल्याचे प्रकरण घडले तेव्हा माझे पती किशोर वाघ घटनास्थळापासून पाच किलोमीटरच्या परिसरातही नव्हते. याप्रकरणात मुख्य आरोपी असलेले गांधी रुग्णालयाचे तत्कालीन महानिरीक्षक गजानन भगत यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांची अजून चौकशीच सुरु आहे. 2011 पासून एसीबीच्या अनेक केसेस पेंडिंग आहेत. पण आता माझ्या नवऱ्यावरच गुन्हा दाखल कसा करण्यात आला, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला.
एसीबीने
ज्याप्रकारने तातडीने गुन्हा दाखल केला त्यासाठी मी गृहमंत्र्यांना तीनदा सॅल्यूट
ठोकते. मी पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवत असल्यामुळे माझ्या पतीला अटक करण्याचे
प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यावर रोज दबाव आणला जातोय, त्यांना टॉर्चर केले जात आहे. पण मला न्यायव्यस्थेवर विश्वास आहे, ती सरकारसारखी मुर्दाड नाही. मी या सरकारला एकटी पुरून उरेन. मी
तुमच्यासोबत 20 वर्षे काम केले आहे, हे
विसरु नका, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.
मीही शरद पवारांच्या तालमीत तयार: चित्रा वाघ
नुकत्याच
पुण्यात झालेल्या पत्रकारपरिषदेतही चित्रा वाघ यांनी शरद पवार यांच्याविषयी
विश्वास व्यक्त केला होता. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या
तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटत नाही. पूजा चव्हाण
मृत्यू प्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला, तर ते संजय राठोडला पाठीशी घालणार नाहीत, हे मी
विश्वासाने सांगते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही मला हा विश्वास
असल्याचे त्यांनी म्हटले होते.
0 टिप्पण्या