Ticker

6/Breaking/ticker-posts

एरंडगाव भागवत येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या..

 

लोकनेता न्यूज 

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

एरंडगाव:-  शेवगाव  तालुक्यातील एरंडगाव भागवत येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. 

शेतीवर कर्ज असल्याने व त्याची परतफेड करण्यास अैपत नसल्याने एरंडगाव भागवत येथील पांडुरंग हरिचंद्र भागवत ( वय ४८ वर्षे ) या शेतकऱ्याने  रविवार   ( दि.७) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहते घरी विषारी औषध घेतले त्यास  उपचारासाठी शेवगाव येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.   शेती, ठिंबक, घर व मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्जाची परतफेड करु न शकल्यामुळे अडचणीत आलेले पांडुरंग भागवत यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती आहे. याबाबत शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या