लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : शेवगाव पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले
पोलिस कर्मचारी बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांचा जीवन रक्षा पदक जाहीर
झाल्याबद्दल नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी
त्यांचा सत्कार करुन त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
यावेळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक दीपाली काळे, उप विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या