लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
साकत : -जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत कोल्हेवाडी येथिल सिंधुबाई बजरंग कोल्हे ( वय ४२) या शेतकरी महिलेचे मळणी यंत्रात अडकून जागीच निधन झाले हि घटना शुक्रवार दि. २६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या सर्वत्र सुगीचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असून साकत परिसरात मोठय़ा प्रमाणावर सुगीचे काम सुरू आहे. मजुर मिळत नाहीत. त्यामुळे घरातील लोक सुगीच्या कामासाठी झटत आसतात. कोल्हेवाडी येथे बजरंग कोल्हे यांच्या शेतात ज्वारीचे खळे सुरू होते. कुटुंबातील लोक मळणी यंत्रावर काम करत होते. खळे संपत आले असताना मळणी यंत्राखाली पडलेले भुसकट काढण्यासाठी सिंधुबाई कोल्हे या वाकून भुसकट काढत होत्या. त्यावेळी ट्रॅक्टर व मळणी यंत्र ज्या ठिकाणी जोडले जाते त्या शाप्टमध्ये सिंधुबाई यांच्या साडीचा पदर अडकला व शाप्टसोबत त्यांच्या शरीराचा भागही गुंतला डोके ही मळणी यंत्रात अडकले काही समजण्याच्या आत ही दुर्घटना घडली.
यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिंधुबाई कोल्हे यांच्या मागे पती, दोन मुले, सुन व नातवंडे असा परिवार आहे. हि घटना समजताच साकत व कोल्हेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या सुगीची धामधूम सुरू आहे. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी गडबडीत वाईट घटना घडतात. तेव्हा मळणी यंत्र हाताळताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवार ठरला घातवार
शुक्रवारीच करमाळा तालुक्यातील पोथरे येथेही एका महिलेचा मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाला व कोल्हेवाडी येथेही एका महिलेचा मृत्यू झाला त्यामुळे शुक्रवार हा घातवार ठरला आहे.
0 टिप्पण्या