हा तर मला संपविण्याचाच कारखानदारांचा डाव .. सर्वसामान्य शेतकरी - सभासदांचा हा विजय
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अ.नगर : नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे दिडशे कोटीचे वाटप केल्यामुळे कारखानदार व प्रस्तापित नाराज झाले जिल्हा बँकेत मी त्यांना अडसर ठरतो म्हणून मला संपवण्याचा डाव खेळला गेला असा घणाघाती हल्ला करून. परंतु शेतकरी . सभासदांनी त्यांचा हा डाव उधळून लावल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री शिवाजीराव यांनी दिली .
ते पुढे ग्रहणाले की, जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजप पक्षाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन पक्षाच्या वतीने निवडणूकीची जबाबदारी माजी मंत्री राधाकृष्ण विखे व माझ्यावर दिली होती. त्यानंतर मी माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बँक बिनविरोधचा प्रस्ताव ठेवला . ही बँक जुने जाणते ज्येष्ठ नेत्यांनी उभी केली याठिकाणी पक्षीय राजकारण नको अशी भुमिका मांडल्यानंतर त्यांनीसुद्धा पाठिंबा दिल्यानंतर खासदार सुजय विखे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर महसुल मंत्री बाळासाहेब यांच्याशी संपर्क केला आणि निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर दोन्ही बाजूनी बिनविरोध निवडणूकीसांठी तयार झाले त्यानंतर सर्व साखर कारखानदार व प्रस्तापित पुढाऱ्यांनी आपआपल्या जागा बिनविरोध करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आणि बिनविरोध करून घेतल्या पण माझी जागा बिनविरोध होऊ नये यासाठी काही पुढाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून ही निवडणूक लादल्याचा आरोप माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केला.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, नगर तालुका सोसायटी संघातून उमेदवारी करीत असतांना माझ्या विरोधात यांना उमेदवार मिळत नव्हता माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे चिरंजीव रावसाहेब पाटील शेळके यांना उमेदवारीसाठी आग्रह करत होते. परंतु त्यांनी त्यास नकार देऊन सांगितले की, शिवाजीराव कर्डिले हे शेतकऱ्यांचे प्रश्न बँकेत मांडतात तसेच माझे वडिल त्यांच्या विरोधात असतानाही माझ्या वडिलांचे नाव नगर तालुका बाजार समितीला देण्याचे काम केले.
उमेदवार मिळत नसतांना क वर्गातील उमेदवाराला उभे राहता येत नव्हते तरी सहकार मंत्र्याकडून दबाव आणूण हा उमेदवार उभा केला. माझ्याकडे कुठलेही पद नसताना व सरकारचा दबाव असतानाही तालुक्याची जनता माझ्यापाठीमागे उभी राहिल्यामुळे माझा विजय होणार आहे. जिल्हा बँकेची ओळख ही कारखानदारांपुरती मर्यादीत होती. परंतु गेल्या पंधरा वर्षात शेतकऱ्यांच्या दारापर्यंत घेऊन गेलो व शेतकऱ्यांना केंद्र व राज्यांच्या योजना समजावून मिळून देण्याच काम केले. पुर्वी जिल्हा बँकेचा वार्षिक होणाऱ्या नफाचे वाटप कारखानदार वाटून घ्यायचे परंतु ते काम मी बंद केले. आता शेतकऱ्यांपर्यंतही नफ्याचे वाटप होऊ लागले. कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये केंद्र व राज्यसरकारने मदतीचा हात दिला जिल्हाबॅकेनेही शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी मी जिरायत भागातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जवाटप केले. मागील आमदारकीच्या निवडणूकीमध्ये हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे माझा पराभव झाला ती चूक यापुढे सुधारू असेही ते म्हणाले . आणखीही बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत , असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे .
पुढे बोलताना कर्डिले म्हणाले की,निवडणूक लादली याच्याशी माझी तक्रार नाही लोकशाही पद्धतीने निवडणूकीला सामोरे गेले आणि मोठ्या मतधिक्याने जिल्हा बँकेचा संचालक म्हणून निवडून देखिल आलो . हा विजय शेतकरी . सभासद व कार्यकत्यांचा आहे . असे सांगून कर्डिले यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी जिल्हा परिषदचे सदस्य माधवराव लामखडे, पै. संभाजी लोढे, विष्णू खांदवे, सुरेश शिंदे, बलभिम शेळके, दत्ता पाटील शेळके, विलास शिदें, अक्षय कर्डिले, सभापती अभिलाश घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, मनोज कोकाटे, वंसत सोनवणे, रेवण चोभे, अशोक झरेकर, नारायण आव्हाड, शिवाजी कार्ले, बन्सी कराळे, संजय ढोणे, अमोल गाडे, मनेष साठे, दिलीप भालसिंग, दत्ता तापकिरे आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0 टिप्पण्या