Ticker

6/Breaking/ticker-posts

लाल किल्ला हिंसाचारातील मुख्य आरोपीला अटक

 लोकनेता न्यूज 

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 नवी दिल्ली : २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या 'ट्रॅक्टर रॅली' दरम्यान घडलेल्या हिंसाचारात घटनेतील मुख्य आरोपी पंजाबी गायक-अभिनेता दीप सिद्धूला अखेर अटक झाली. दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलनं दीप सिद्धू याला अटक केली.

    २६ जानेवारी  दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर दीप सिद्धू फरार होता. ट्रॅक्टर रॅली दरम्यान आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना नियोजित मार्गावरून दुसऱ्या मार्गावर नेण्याचा तसंच शेतकऱ्यांना चिथावण्याचा प्रयत्न केल्याचा सिद्धू याच्यावर आरोप आहे. उल्लेखनीय म्हणजे, प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचार प्रकरणात आत्तापर्यंत १२७ जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी, याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हरप्रीत सिंह (३२ वर्ष), हरजीत सिंह (४८ वर्ष), धर्मेंद्र सिंह (५५ वर्ष) या लोकांनाही अटक केलीय. सीसीटीव्ही आणि मोबाईल फुटेजद्वारे पोलीस हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ
    फरार झाल्यानंतर सिद्धू सोशल मीडियाद्वारे आपले व्हिडिओ पोस्ट करत होता. आपल्या एका जवळच्या मित्राच्या मदतीनं तो हे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या व्हिडिओंद्वारे आपण निर्दोष असल्याचा दावा सिद्धू करत होता. दीप सिद्धूला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या अनेक टीम्स पंजाबमध्ये अनेक ठिकाणी शोध घेत होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या