Ticker

6/Breaking/ticker-posts

पेट्रोल-डिझेलबाबत ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत ?

 




लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. पेट्रोल दराने शंभरी गाठली आहे. मात्र ठाकरे सरकार राज्यातील जनतेला दिलासा देण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याचे संकेत आहेत. राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याची माहिती अर्थखात्यातील सूत्रांनी दिली आहे.

 

पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये थोड्याफार प्रमाणात कपात केली जाऊ शकते. येत्या 8 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकसल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील सेस काही प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. राज्यात पडलेल्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी तेव्हाच्या राज्य सरकारने 2018 मध्ये पेट्रोल आणि डिझेलवर दुष्काळ कर म्हणून 2 रुपये सेस आकारला होता. आता दुष्काळ नसला तरी हा दोन रुपये सेस अद्यापही कायम आहे. राज्य सरकार व्हॅटबरोबरच पेट्रोल आणि डिझेलवर विविध बाबींसाठी सेस आकारत आहे. यातील सेस काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

राज्यातील पेट्रोलचे आजचे दर

मुंबई – 97.34 प्रतिलिटर

ठाणे – 96.86 प्रतिलिटर

पुणे – 97.47 प्रतिलिटर

नागपूर – 97.84 प्रतिलिटर

सांगली – 97.26 प्रतिलिटर

सातारा – 97.81 प्रतिलिटर

औरंगाबाद – 97.93 प्रतिलिटर

कोल्हापूर – 97.45 प्रतिलिटर

राज्यातील डिझलचे दर

मुंबई – 88.44 प्रतिलिटर

ठाणे – 86.61 प्रतिलिटर

पुणे – 87.21 प्रतिलिटर

नागपूर – 88.99 प्रतिलिटर

सांगली – 87.04 प्रतिलिटर

सातारा – 87.57 प्रतिलिटर

औरंगाबाद – 87.89 प्रतिलिटर

कोल्हापूर – 87.22 प्रतिलिटर

कर किती आणि कोणता (89.29 रुपये दर असताना)

मूळ किंमत (1 लीटर पेट्रोलचा एक्‍स फॅक्‍टरी दर)- 31.82 रूपये

वाहतूक खर्च – 0.28 पैसे

उत्पादन शुल्क – 32. 90 रू . ( केंद्र सरकार )

डीलरचे कमिशन – 3. 68 रू.

मूल्यवर्धीत कर (व्हॅट) – 20.61 रू. (राज्य सरकार)

तुमच्याकडून घेतले जाणारे पैसे – 89.29 रू.

म्हणजेच 32 रुपये लीटरचं पेट्रोल तुम्हाला मिळतं, 89 रुपये 30 पैशांनायातील केंद्र आणि राज्य सरकारची कमाई लीटरमध्ये तब्बल 52 रुपये आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या