लोकनेता न्यूज ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
सरपंचपदी विद्या लोढे तर उपसरपंच गायत्री लोढे
दहिगावने :-शेवगाव तालुक्यातील दहिगावने गणातील मजले शहर ग्रामपंचायत
सरपंचपदी विद्या अशोक लोढे तर उपसरपंच पदी गायत्री अशोक लोढे यांची बिनविरोध निवड
झाली आहे. येथे भाजप तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे यांच्या भाजप प्रणीत मंडळाचा दारुण
पराभव करून विक्रम लोढे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रणीत
मंडळाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. येथे दोन्ही पदावर महिलांना संधी मिळाली
असून आगामी पाच वर्षे मजले शहर ग्रामपंचायतवर महिला राज असणार आहे. बिनविरोध निवड
साठी पॕनलचालक विक्रम लोढे, स्वाभिमानी
पक्षाचे मच्छिंद्र आरले, रावसाहेब लोढे, नारायण लोढे, रंगनाथ
मगर, अशोक लोढे, आप्पासाहेब फटांगडे, ह. भ.प. त्रिंबक महाराज बोरूडे,
अशोक बोरूडे, दिनकर फटांगडे, रविंद्र लोढे, राजेंद्र लोढे, हरीराम मगर, अंबादास खरात,
दिलावर पठाण, संदीप दारकुंडे,शंकर काळे, दत्ता कदम, मनोज दळवी, नानासाहेब नरवडे, सर्जेराव
गायकवाड, आदींसह मंडळ कार्यकर्ते यांनी परीश्रम घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत
पालवे यांनी काम पाहिले तर ग्रामसेवक चंद्कांत देशमुख यांनी सहकार्य केले. अशोक वकीलराव
लोढे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या