Ticker

6/Breaking/ticker-posts

धक्कादायक : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला

  



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला असून आजही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात आज 6 हजार 112 नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाचा विळखा अधिक घट्ट झाला आहे. तसंच आज 44 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. नवीन वर्षात लस आल्याने कोरोनाला हरवणं शक्य होईल, असं बोललं जात असतानाच पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वेगाने पसरू लागला आहे.


महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ तर झालीच आहे, त्याचबरोबर रुग्ण बरं होण्याचं प्रमाणही घडलं आहे. 10 दिवसात तब्बल अ‍ॅक्टिव्ह 10 हजार रुग्ण वाढले आहेत. – रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95.31 वर 9 फेब्रुवारीला 34 हजार 640 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण होते. 19 फेब्रुवारीपर्यंत 44 हजार 765 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण झाले बरे होण्याचं प्रमाण 95 .74 ℅ वरून 95.31 वर घसरले.


कोरोना रोखण्यासाठी सरकारने उचललं पाऊल राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांमध्ये यासंदर्भातील निर्बंध आदेश जारी करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दर रविवार संपूर्ण तर रात्रीही संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण तपासणीचा वेग वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबरोबरच इतरही काही जिल्ह्यांत विविध निर्बंध लादण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या