Ticker

6/Breaking/ticker-posts

तुमच्या हक्काचे तर देणारच - ना. तनपुरे

 

लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नगर:- पाथर्डी राहुरी तालुक्यातील 43 गावांमधील 105 पाझर तलावासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीसाठी पाणी सोडण्याची मागणी या भागाचे लोकप्रतिनिधी व राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे राष्ट्रवादी युवकचे अजय पाठक, सरपंच अमोल वाघ ,युवानेते जालिंदर वामन, ग्रामपंचायत सदस्य गणेश पालवे, बाबासाहेब बुधवंत, चेअरमन संतोष गरुड ,युवानेते रवींद्र मुळे, अशोक टेमकर, देवेंद्र गीते, शिवसेनेचे तालुका संघटक राजेंद्र म्हस्के, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष अनिल रांधवणे, उपतालुकाप्रमुख भारत वांढेकर यांनी केली आहे. पाथर्डी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीच्या ताब्यात आलेल्या ग्रामपंचायतसदस्यांचा मंत्री तनपुरे यांच्या हस्ते  सत्कारकरण्यात आला. पाथर्डी तालुका दौऱ्यावर आलेले मंत्री तनपुरे यांच्याकडे मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात वांबोरी चारीला पाणी सोडल्यामुळे या भागातील लाभधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला त्यानंतर आता तलावातील पाण्याची पातळी खालावली असून हक्काचे पाणी या भागातील लाभधारक  शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी तनपुरे यांच्याकडे कार्यकर्त्यांनी केली आहे.

अगोदरचे पाणी बोनस 


याअगोदर लाभधारक पाझर तलावात सोडण्यात आलेले पाणी बोनस म्हणुन होते
  तुमच्या हक्काचे 680 एमसिप्टी पाणी निश्चितपणे तुम्हाला देणार. आम्ही पाणी देणारे आहोत पाणी अडवणारे नाहीत त्यामुळे पाण्याच्या बाबतीत काळजी करू नका लाभधारक शेतकऱ्यांना पाण्याबाबतची अडचण भासू देणार नाही अशा शब्दात मंत्री तनपुरे यांनी शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या