101 जणांची वर्णी 24 जातींना आणि सर्व पक्षीय सदस्यांना संधी
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: ओबीसी, व्हीजे, एनटी जनमोर्चाच्या अहमदनगर शहर जिल्हा शाखेची कार्यकारिणी सर्व संमतीने आणि संघटनेचे संस्थापक बाळासाहेब सानप यांच्यासह वरिष्ठांच्या अनुमोदनाने शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी जाहीर केली.
ओबीसी, व्हीजे, एनटी.तील सर्व समाजातील तसेच सर्व राजकीय पक्षातील सदस्यांनाही या कार्यकारिणीत स्थान देऊन सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भुमिका बाळासाहेब भुजबळ यांनी मांडली आहे. जाहीर झालेल्या या कार्यकारिणीत ओबीसी, व्हीजे, एनटी.च्या डिसेंबर महिन्यांत झालेल्या मेळाव्यापासून संघटीतपणे कार्यरत असलेल्या सदस्यांची वर्णी लावण्यात आली आहे. या कार्यकारिणीत माळी, वंजारी, नाभिक, सोनार, धनगर, गवळी, वैदू, तेली, कासार, गुरव, मुस्लिम, पद्मशाळी, साळी, रावळ, वडारी, लोणार, परिट, कोल्हाटी, गोपाळ, कोष्टी, काशिकापडी, लोहार, सुतार, आदि समाजातील सदस्यांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. कार्यकारिणी व्यतिरिक्त संघटनेच्या विविध समित्या स्थापन करुन त्यात उर्वरित सदस्यांना संधी देण्यात येईल. युवा, महिला, उत्सव समिती आदि समित्यांचा यात समावेश राहणार आहे, अशी माहिती श्री.भुजबळ यांनी दिली.
कार्यकारिणी अशी :
अध्यक्ष - बाळासाहेब भुजबळ,
सल्लागार - बाळासाहेब बोराटे,
उपाध्यक्ष - दत्ता जाधव, विशाल वालकर, रमेश सानप, सचिन डफळ, ज्ञानेश्वर गायकवाड, विजय काळे, प्रकाश सैंदर, इंजि.बाळासाहेब भुजबळ, अशोक दहिफळे, प्रकाश लोळगे.
सरचिटणीस - जयंत येलूलकर, संजय आव्हाड, श्रीकांत मांढरे, डॉ.श्रीकांत चेमटे, रमेश बिडवे, अनिल इवळे, शाम औटी, नितीन भुतारे, संजय सागांवकर, फिरोज शफीखान, शशिकांत पवार, अभिजित कांबळे.
सहचिटणीस - सुनिल भिंगारे, मनोज राऊत, दिपक कांबळे, बाळासाहेब मिसाळ, श्रीनिवास बोज्जा, दशरथ शिंदे, कैलास गर्जे, गौरव ढोणे, नईम शेख, संजय सैंदर, गणेश झिंजे, सरफराज जहागिरदार, प्रविण ढापसे.
खजिनदार - चंद्रकांत फुलारी.
कार्यकारिणी सदस्य - अनिल निकम, बालाजी डहाळे, नितीन शेलार, प्रमोद कानडे, सुनिल त्र्यंबके, सचिन जाधव, अर्जुन बोरुडे, धनंजय जाधव, अशोक कानडे, काका शेळके, अशोक तुपे, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, नामदेव लंगोटे, जालिंदर बोरुडे, दिपक देहेकर, राजेंद्र पडोळे, प्रमोद भिंगारे, नितीन डागवाले, दिपक खेडकर, सागर फुलसौंदर, हर्षल म्हस्के, निजाम पठाण, हेमंत रासने, कैलास दळवी, गिरिष जाधव, अॅड.अभय राजे, प्रकाश इवळे, राजू ढोरे, गणेश आपरे, सुनिल पतकी.
विशेष निमंत्रित - प्रतापकाका ढाकणे, बाबुशेठ टायरवाले, भगवान फुलसौंदर, अभय आगरकर, आनंद लहामगे, अंबादास गारुडकर, शौकतभाई तांबोळी, अशोक सोनवणे, बाबासाहेब सानप, डॉ.सुदर्शन गोरे, अनिल बोरुडे, रामदास आंधळे, शरद झोडगे, विक्रम राठोड.
प्रसिद्धी प्रमुख - राजेश सटाणकर, किरण बोरुडे, राजू खरपुडे, महेश कांबळे, निशांत दातीर, उद्धव काळापहाड, अमोल बागुल, प्रसाद शिंदे, अमोल भांबरकर, प्रकाश भंडारे.
महिला विभाग - स्वाती पवळे, छाया नवले, मनिषा गुरव, मंगल भुजबळ, किरण अळकुटे, रजनी ताठे, गौतमी भिंगारदिवे, वनिता बिडवे.
0 टिप्पण्या