Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रभाग क्र. १ साठी व्यायाम शाळा मंजूर- नगरसेवक प्रविण राजगुरू

 



 






लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पाथर्डी : -भागातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रभाग क्र . १ च्या वामनभाऊ नगर परिसरासाठी बंदिस्त व खुल्या व्यायाम शाळेला मंजूरी मिळाल्याची माहिती  पाथर्डी नगरपरिषदेचे नगरसेवक  प्रविण राजगुरू यांनी दिली .

याबाबत अधिक माहिती देतांना राजगुरु म्हणाले की .  स्पर्धेच्या व धावपळीच्या जीवनात सर्वच वयोगटातील लोकांचे व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कमी वयातच आरोग्याच्या अनेक समस्या उभे राहत आहेत. अभ्यासाच्या ताणातून मुले मैदानी खेळ व व्यायामा पासून दुरावली आहेत. तरुण वयातील व्यक्तींना करिअर आणि कामाच्या व्यापातून रोजच्या व्यायामाला वेळ देता येत नाही. अशा बदलत्या जीवनशैलीत व्यायामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे लठ्ठपणा हृदयविकार उच्च रक्तदाब डायबिटीस पक्षाघात सांधेदुखी गुडघेदुखी मानसिक तणाव यासारख्या अनेक गंभीर आजारांचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे. 

पैसा व सुख वस्तूंच्या हव्यासापोटी व्यायामाकडे दुर्लक्ष करून आपण आपले बहुमूल्य असे आरोग्य धोक्यात घालत आहोत. ह्या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्या प्रभागातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी नगरसेवक प्रविण राजगुरू यांच्या संगल्पना व पाठपुराव्याने प्रभाग क्र.१ मधील वामानभाऊ नगर व म्हस्के कॉलनी,दलित वस्ती येथे खुले व बंदीस्त व्यामशाळेचा नागरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी विषय मांडला होता त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. 

व्यायामशाळेचा प्रस्ताव आमदार मोनिकाताई राजळे व नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे यांच्या मार्गदर्शनाने तयार करून संबधित विभागाकडे पाठवला जाणार आहे. अशी माहिती  नगरसेवक प्रविण राजगुरू यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या