जगाला दिशा देणार्या श्रीराम मंदिर कार्यात सहभागी झाल्याचा आनंद - सुमित वर्मा
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमनगर: आयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण व्हावे, ही भाविकांची भावना होती. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु होता. आता सर्व संकटे दूर होऊन श्रीराम मंदिर निर्माण होत आहे, ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. या निर्माण कार्यात प्रत्येकाचा सहभाग असावा, या उद्देशाने सुरु केलेल्या उपक्रमात सर्वच सहभागी होत आहे.जगाला दिशा देण या मंदिर निर्माणात सहभागी झाल्याचा आनंद होत आहे, असे प्रतिपादन मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले.
मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने आयोध्या येथे निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिरास देणगी देण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, सागर सुरपुरे, भैय्या भांडेकर, अनिकेत जाधव, साहिल गांधी, महादेव दहिफळे, ओंकार काळे, आदित्य अनेचा, अनमोल कांकरिया, अतुल जगताप, गौरव कांकरिया आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सागर सुरपुरे म्हणाले, नगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त नागरिकांना या निर्माण कार्यात देणगीरुपाने सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून, आभार मानले.
0 टिप्पण्या