Ticker

6/Breaking/ticker-posts

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर नाना पटोले .. !

 


लोकनेता न्यूज
 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या सर्व तर्कवितर्कांना अखेर पुर्णविराम मिळाला असून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची वर्णी लागली आहे. दिल्लीहून हायकमांडने पटोले यांच्या नावाची आज घोषणा केली. 

त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा कालच राजीनामा दिला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासात नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष तर त्यांच्या सोबतीला 6 नवे कार्याध्यक्षही देण्यात आले आहेत. याशिवाय दहा उपाध्यक्षांची फौजही त्यांच्या दिमतीला आहे. हायकमांडने कॉंग्रेसला उभारी देऊन ओबीसीवर प्रभूत्व मिळविण्यासाठी पटोलेंचा पत्ता ओपन केला आहे . आता भाजपच्या दिमतीला असलेल्या ओबीसी समाजाला कांग्रेसच्या झेंडया खाली आणण्याचे खरे आव्हान असणार आहे .

नाना पटोले हे ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करीत असून काँग्रेसचे एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. काँग्रेस प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सांभाळताना या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार  आहे.

 नवी कार्यकारणी अशी-कार्याध्यक्ष :शिवाजी मोघे, बस्वराज पाटील, नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे,प्रणिती शिंदे 

प्रदेश उपाध्यक्ष : शिरीष चौधरी, रमेश बागवे,हुसैन दलवाई,मोहन जोशी, रणजीत कांबळे, कैलाश गोरंट्याल,बी. आय. नगराळे,शरद अहेर, एम. एम. शेख, माणिकराव जगताप

संसदीय कमिटी :नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शरद रणपिसे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, शिवाजीराव पाटील, मुकुल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव, अविनाश पांडे, मिलिंद देवरा, विलास मुत्तेमवार, माणिकराव ठाकरे, भाई जगताप, के. सी पाडवी, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, विश्वजित कदम, अमित देशमुख, वसंत पुरके, सुरेश शेट्टी, हुसेन दलवाई, अनंत गाडगीळ, बाबा सिद्धीकी, आशिष देशमुख, भालचंद्र मुणगेकर यांची निवड करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या